Share

मुख्यमंत्री ठाकरे औरंगाबादेत दाखल, उच्च न्यायालय खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे करणार उद्घाटन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन आज 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत.

दरम्यान खंडपीठाच्या मागील बाजूस नव्याने बी आणि सी विंग तयार करण्यात आले आहे. मात्र या अ‍ॅनेक्स बिल्डिंगच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झाला होता. या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम व पत्रिकेवर वकील संघाची दखल न घेतल्याने खंडपीठ वकील संघाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान आज या अतिरिक्त इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री ठाकरे देखील शहरात दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील न्या. उदय ललीत, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. भूषण गवई, न्या. अभय ओक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या.दीपांकर दत्ता उपस्थित असतील. सरन्यायाधीश रमण्णा पहिल्यांदाच या उद्धघाटन सोहळ्या निमित्त औरंगाबादेत येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!