Share

धुळ्यात बॅनरवरील फोटोचा वाद; रोहित पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात झटपट

Published On: 

🕒 1 min read

धुळे : कर्जत- जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या धुळे दौऱ्याला गालबोट लागले आहे. शुक्रवारी रोहित पवार शुक्रवारी धुळे दौऱ्यावर होते, दरम्यान स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर माजी आमदार तथा येथील प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा फोटो नसल्याने सुरुवातीला शब्दिक वाद झाले. त्यानंतर रोहित पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत हे प्रकरण हाताबाहेर गेले होते. अखेर तीसऱ्या गटाने रोहित पवारांना बुलेटवर बसवून देवपूरला देवदर्शनासाठी नेले.

रोहित पवार यांचे धुळे शहरात शुक्रवारी दुपारी साडेपाच वाजता आगमन झाले. शहरातील प्रकाश थिएटर चौकात स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गोटे यांचा फोटो नसल्याने गोटे समर्थक प्रशांत भदाणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यात शब्दीक चकमक सुरु झाली. काही वेळातच त्याचे रुपांतर वादात झाले मग एकमेकांची कॉलर धरली, आणि दोघाही कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरू झाली. यावेळी रोहित पवार यांनी दोन्ही गटांना अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्हीही गटाचे कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे तीसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी त्यांना बुलेटवर पसार केले.

यावेळी रोहित पवार तेथून जाण्याच्या मनस्थितीत नव्हते तरीही तीसऱ्या गटाने संधी साधत त्यांना खूप आग्रह करत बुलेटवर बसवून दूर नेले. तरीही पारोळा रोडवर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुरूच होती. या वादामुळे धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. हा बॅनर पक्षातर्फे नाही तर स्वखर्चाने लवण्यात आल्याचे स्पष्टीकरण कुणाल पवार यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!