Share

खंडणी मागणाऱ्यांना फोडून, मोक्का लावून आत टाकावे ; मुनगंटीवारांची मागणी

Published On: 

मुंबई : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून शिवसेनेच्या दहशत पसरवणाऱ्या कारवायांमुळे चांगलेच संतापले आहेत. ‘महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असताना शिवसेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांच्या यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून अधिकारी, कर्मचारी-कामगारांमध्ये दहशत निर्माण करीत काम बंद पाडत आहेत.

हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल,’ असा स्पष्ट इशारा नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. दरम्यान आता यावर भाजपच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यावर बोलताना म्हणले कि, ‘ पोलीस विभागाने सुमोटो कारवाई केली पाहिजे. राज्यात खंडणी मागणारे सुरक्षित आहेत पण त्रास होणाऱ्यांत मात्र असुरक्षिततेची भावना आहे,’ असे मुनगंटीवार म्हणाले.

तसेच असुरक्षिततेची भावना असेल तर सर्वांनी याचा एकत्र येऊन विचार केला पाहिजे. मी कोणत्याही राजकीय पक्षावर आरोप करणार नाही पण खंडणी मागणारे या पक्षाचे त्या नेत्यांचे मागे जाऊन त्यांचे नारे लावत स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. खंडणी मागणाऱ्यांना फोडून काढण्यासाठी कायदा केला पाहिजे. त्यांना मोक्का लावून आत टाकावं, असं मुनंगटीवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पत्रावर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!