Share

हनुमान नगर खून प्रकरण ; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Published On: 

औरंगाबाद : भांडणाच्‍या कारणावरुन तरुणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. प्रकरणी महिलेसह पाचही आरोपींच्‍या कोठडीत १७ ऑगस्‍टपर्यंत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी शनिवारी दिले.

गणेश रविंद्र तनपुरे (१९), ऋषीकेश रविंद्र तनपुरे (२१), संदीप त्रिंबक जाधव (४५), राहुल युवराज पवार (२४) आणि मंगल रविंद्र तनपुरे (४०, सर्व रा. हनुमान नगर, गारखेडा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत.प्रकरणा मयत आकाश रुपचंद राजपूत (21, रा. अजिंक्यनगर, गारखेडा परिसर) याचा भाऊ प्रविण राजपुत याने फिर्याद दिली. त्‍यानूसार, दोन दिवसांपुर्वी कुख्यात गुन्हेगार गणेश तनपुरेचे आकाशचा मित्र सागर राऊत याच्‍यासोबत हुसेन कॉलनीत भांडण झाले होते. त्यावेळी तेथे आकाश देखील उपस्थित होता. त्याचा राग गणेशच्या मनात खदखदत होता. रविवारी रात्री सागर आणि आकाश दिसताच त्याने दोघांना गल्लीत रोखले. संधी साधुन सागर तेथून पळून गेला. मात्र, आरोपींनी आकाशला पकडून ठेवले. आकाशला मारहाण करुन वरील आरोपींनी त्‍याचा चाकू भोसकून खून केला. प्रकरणात पुंडलिक नगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना ९ ऑगस्‍ट रोजी अटक करण्‍यात आली. आज आरोपींच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, न्‍यायालयाने त्‍यांच्‍या पोलीस कोठडीत १७ ऑगस्‍टपर्यंत वाढ केली. प्रकरणात सहायक सरकारी वकील गौतम कदम यांनी काम पाहिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!