यवतमाळ : पूजा चव्हाण नामक तरुणीच्या मृत्यूमागे माजी वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता. याप्रकरणातील काही ऑडिओ व फोटो समोर आल्यानंतर हे प्रकरण अधिक गंभीर झाले होते. भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
आता संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. ते वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिलेने केला असून आपली तक्रार यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाद्वारे केली होती. मात्र, त्याकाळी राठोड हे मंत्रीपदी असल्याने कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.
संजय राठोड यांनी हे सर्व आरोप TRP साठी केले जात असल्याचं म्हणत कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. मात्र आता संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोस्टाने तक्रार करून काही कारवाई झाली नसल्याने आता या महिलेने थेट पोलीस ठाणे गाठलं आहे. घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रारदार महिला एका कारने कुटुंबासह दाखल झाली. याबाबत SIT ने महिलेचा जबाब नोंदवला. संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल.
हा संजय राठोड दुसरा तिसरा कोणी नाही तर…
‘पतीला नोकरीवर पूर्ववत करण्यासाठी संजय राठोड यांनी मानसिक, शारीरिक छळ केला. यासोबतच आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या महिलेने तक्रार करताना वजनदार राजकीय नेते संजय राठोड असा उल्लेख केला असून हा दुसरा तिसरा कोणी नसून माजी वनमंत्री संजय राठोड हाच आहे,’ असं चित्रा वाघ यांनी काल पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हिंदुहृदयसम्राट तर गडकरींचा उल्लेख रोडकरी करत’; शिवसेना खासदाराने करून दिली ‘ती’ आठवण
- ‘प्रकाश आंबेडकर सोबत आले, तरच रिपब्लिकन ऐक्य शक्य’, रामदास आठवलेंची भूमिका
- पुण्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
- अभिनेता सुव्रत जोशी ‘जॅाबलेस’ वेब सीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
- तालिबानी हिंसाचाराने गाठला कळस ; राष्ट्रपती राजीनामा देऊन कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

