Share

तालिबानी हिंसाचाराने गाठला कळस ; राष्ट्रपती राजीनामा देऊन कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत

Published On: 

नवी दिल्ली : अफगाणिस्तान आणि तालिबानमधील गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध आता आणखी गंभीर झालं आहे. एक एक करत देशातील अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात गेली आहेत. अमेरिकेने आधीच तिथून काढता पाय घेतला आहे. यामुळे तेथील नागरिकांसह राज्यकर्ते देखील हतबल झाले असल्याचे सध्या दिसत आहे. दरम्यान आता अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी राजीनामा देण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानमधील विविध प्रांतामध्ये सुरु असलेल्या चकमकी थांबवणे आणि तालिबानशी तात्काळ युद्धविराम करण्याच्या उद्देशानं घनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घनी राजधानी काबूलचं संरक्षण व्हावं यासाठी बुधवारी मजार-ए-शरीफमध्ये गेले होते. त्यावेळी सरकारशी संबंधित मिलिशिया कमांडरांसोबत त्यांची बैठक झाली. तालिबान दहशतवादी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या अगदी जवळ आले आहेत. त्याचवेळी शांतता चर्चा समिती नवा मसूदा तयार करत आहे. यामध्ये राष्ट्रपती अश्रफ घनी सरकारला पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील सर्व भारतीय नागरिकांनी तेथील हवाईसेवा बंद होण्याआधीच मायदेशी परतावे, अशी सूचना भारताने केली होती. सध्या अफगणिस्तानात १५०० भारतीय राहत आहेत. हिंसाचारामुळे अफगाणिस्तानातील अनेक शहरांतील विमानसेवा खंडित झाली आहे. अफगाणिस्तानातील भारतीय कंपन्यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना मायदेशी पाठवावे, अशी सूचना भारताच्या काबूलमधील दूतावासाने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!