पुणे : कोरोना साथीच्या कालावधीत देशात लॉकडाउन लागू करण्यात आले. यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले तर अनेक लोक बेरोजगार झाले. अनेक लोकांवर यामुळे आर्थिक संकट ओढवले. मात्र आता नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची माहिती आहे. आता इच्छुक उमेदवाराना पुण्यातील डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या 11 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी https://www.diat.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक असून या पदासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयांमध्ये Ph.D. पदवी असणे आवश्यक आहे. तर सहाय्यक प्राध्यापक संबंधित विषयांमध्ये Ph.D. पदवी आवश्यक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आमदारांच्या नियुक्तीवरून हायकोर्टाच्या सुनावणीनंतर राज्यपाल कोश्यारी अमित शाहांच्या भेटीला
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !
- इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाठला मैलाचा टप्पा, द वॉल द्रविडला टाकले मागे
- नितीन गडकरींच्या स्फोटक पत्रावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया !
- ‘जसं 370 कलम हटवलं, तसंच…’; संजय राऊत यांची थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

