मेळघाट : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
तर, अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती आटोक्याबाहेर गेल्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. दिवसेंदिवस अनेक नागरिकांना कोरोनामुळे जीवदेखील गमवावा लागत आहे. एकूणच राज्यातील स्थिती ही गंभीर असल्याने सर्व सण, उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच, होळीसाठी देखील निर्बंध लावण्यात आले आहेत.
मात्र, लोकप्रतिनिधींनाच कोरोना नियमांचा विसर पडल्याचे समोर येत आहे. याआधी देखील लोकप्रतिनिधी कोरोना नियमांना धाब्यावर बसवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी कोरोना नियमांना हरताळ फासत जल्लोषात होळी साजरी केली आहे.
त्यामुळे हे नियम फक्त सामान्य नागरिकांवरच लादले जात आहेत का ? लोकप्रतिनिधींना आपल्या जबाबदारीचे भान नाही का ? सामान्य नागरिक लोकप्रतिनिधींचे असे आदर्श घेणार का ? असे संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत.
राणा दाम्पत्य हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी मेळघाट या ठिकाणी गेले. गेल्या ११ वर्षांपासून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मेळघाटात आदिवासी समुदायासोबत होळी साजरी करतात. यावर्षीही त्यांनी त्यांची परंपरा कायम राखली. तर गावातील आदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला आहे.
मात्र यावेळी कोरोना नियमांचे त्यांनी पालन न झाल्याचे समोर आले आहे. राणा दाम्पत्याने मास्क तर घातला नव्हताच, सोबतच सोशल डिस्टंसिंगचा देखील फज्जा उडाल्याचं दिसून आलं. कधी विनामास्क बुलेटस्वारी, तर कधी विनामास्क एसटी प्रवास यामुळे टीकेचे धनी झालेल्या राणा दाम्पत्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘होळीवरील बंधने मोदी सरकारमुळेच; आता भाजप नेत्यांनी मोदींविरोधात बोंब मारावी’
- गेट २०२१ चा निकाल जाहीर; आयआयटी मुंबईने स्कोअरकार्ड केले जाहीर
- महत्त्वाची बातमी : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ मंदिर राहणार बंद
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

