Share

…अन् सुप्रिया सुळेंच्या समोरच दिल्या गेल्या ‘अजित पवार मुर्दाबाद’ च्या घोषणा

Published On: 

पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात दि. २४ जून रोजी सकाळी अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच यावेळी आंदोलन करत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तर, शेकडो कुटुंब ऐन पावसाळ्यात उघड्यावर पडली आहेत.

अखेर स्थानिकांच्या आक्रोशानंतर आणि पोलीस-स्थानिक यांच्या संघर्षानंतर न्यायालयाने या तोडकामास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. तर, ऐन पावसाळ्यात घाईने करण्यात आलेल्या या कारवाईवर सर्वच पक्षीय नेत्यांनी नाराजी वर्तवली असतानाच ही कारवाई नेमकी कोणाच्या सांगण्यावरून झाली याबाबत अनेक चर्चा शहरात सुरु आहेत. पुण्यातील आंबिल ओढा प्रकरणातील विकासक उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा निकटवर्तीय असल्याची कुजबुज आहे.

दरम्यान, घरं पाडण्यात आलेल्या स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांनी कारवाई का करण्यात आली, पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर घरं पाडल्याबद्दल अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी या स्थानिकांकडून करण्यात आली.

तर, पाडण्यात आलेली घरं बांधून देण्यात यावी अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली असून कारवाई करताना महापालिकेच्या आयुक्तांसमोर निकमने ‘मी अजित पवार यांचा माणूस आहे. मला कुणीच काही करू शकत नाही’, अशी दमदाटी केल्याचं देखील सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून देत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!