🕒 1 min read
मुंबई – ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बेकायदा पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी दिल्ली, नागपूर, औरंगाबाद , हैदराबाद , मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून मागविली आहे.
भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली. राऊत यांच्या विमान प्रवासावरील खर्चाची राज्य वीज नियामक आयोगानेही चौकशी करावी, अशी मागणीही पाठक यांनी यावेळी केली.
पाठक यांनी सांगितले की, लॉकडाऊन काळात राऊत यांनी वीज कंपन्यांच्या खर्चाने दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नागपूर, मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाबाबत केंद्रीय कंपनी मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या संदर्भात वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने चारही वीज कंपन्यांकडून राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील मागविला आहे. या मुळे राऊत यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. वीज कंपन्यांचा महसूल आणि त्यांचा खर्च याबाबतीत निर्देश देण्याचा अधिकार असलेल्या राज्य वीज नियामक आयोगानेही राऊत यांच्या बेकायदा खर्चाची चौकशी करावी, अशी मागणीही पाठक यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- परस्त्री सोबत शॉपिंगला जाणे पडले महागात, भरबाजारात अदनानची आयशाने धुलाई केली
- ‘अजय -आतुल’ यांना मिळाला दशकातील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार
- ‘फडणवीसांना वेगळा न्याय का ? त्यांनी तो सीडीआर तपास यंत्रणेकडे द्यावा !’
- खळबळ! बीडमध्ये प्रथम लस घेणाऱ्या डॉक्टरला कोरोना
- महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणासाठी आनंद महिंद्रांची मोदींकडे ‘ही’ मोठी मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

