🕒 1 min read
मेरठ – मेरठच्या नौचंडी परिसरातील मध्यवर्ती बाजारात एका महिलेबरोबर फिरणे एका महाभागाला चांगलेच महागात पडले आहे. परस्त्री सोबत फिरणाऱ्या या महाभागाची त्याच्या पत्नीने भरबाजारात चांगलीच धुलाई केली.
अदनान नावाचा हा व्यक्ती एका तरूणीसोबत बाजारात खरेदी करण्यासाठी आला होता. त्याच वेळी अदनान ची पत्नी असणारी आयशा तिथे पोहोचली. आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्री सोबत फिरताना पाहून आयशाने तिथे जोरदार गोंधळ सुरू केला आणि त्यानंतर अदनान आणि आयशा यांच्यात चांगलीच हाणामारी सुरू झाली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पती-पत्नीला पोलिस ठाण्यात नेले. पोलिस ठाण्यात या दोघांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. आयशा सांगते की तिचे आणि अदनानचे लग्न एक वर्षापूर्वी झाले होते, काही काळानंतर दोघांमध्ये भांडण झाले.अदनानने तिला माहेरी सोडले होते.
अदनानचे म्हणणे आहे की त्याने आयशाला घटस्फोट दिला असून अद्याप घटस्फोट झालेला नसला तरी खटला चालू आहे. आयशाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अदनान यांनी केला आहे. जेव्हा तो त्याच्या एका मैत्रिणीसह बाजारात होता तेव्हा आयशा काही लोकांसह आली आणि तिला शिवीगाळ, मारहाण केली.
आयशा म्हणाली की तिने घटस्फोट घेतला नाही आणि अदनान तिला बनावट मार्गाने घटस्फोट देत आहे. मी अद्याप कोणत्याही कागदावर स्वाक्षरी केलेली नाही. जर अदनानचे विधान खरे असेल तर कागद दाखवावा. मला अदनानला तुरूंगात पाठवायचे आहे असे ती म्हणाली.
महत्वाच्या बातम्या
- वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाई त्यातून हिस्सा घेतो – नितेश राणे
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
