🕒 1 min read
मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या प्रकरणाचे पुरावे असूनही सचिन वाझेंवर कारवाई का होत नाही ? असा सवाल करत त्यांनी सीडीआर माहिती द्वारे सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांची आधी पासूनच ओळख असल्याचे समोर आणले होते.
आता सीडीआर मुद्द्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी, फडणवीसांनी सीडीआर बाबतची माहिती तपास यंत्रणांना द्यायला हवी अशी मागणी केली आहे. ‘सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे त्यांचे कर्तव्य आहे. CDR मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने CDR racket उघडकीस आणले होते,’ अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे.
सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये.
स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास आहे व विनंतीही आहे.— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 16, 2021
पुढे सावंत म्हणाले, ‘नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास आहे व विनंतीही आहे.’
महत्वाच्या बातम्या
- परस्त्री सोबत शॉपिंगला जाणे पडले महागात, भरबाजारात अदनानची आयशाने धुलाई केली
- ‘अजय -आतुल’ यांना मिळाला दशकातील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार
- युवासेना-भाजप वाद चिघळला : भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न, युवासेनेचा तुफान राडा
- खळबळ! बीडमध्ये प्रथम लस घेणाऱ्या डॉक्टरला कोरोना
- महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणासाठी आनंद महिंद्रांची मोदींकडे ‘ही’ मोठी मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
