🕒 1 min read
मुंबई : हिंदी संगीत सृष्टीत मानाचा समजला जाणारा मिर्ची म्युजिक पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येईल अशी एक खास गोष्ट घडली. मराठीपाठोपाठ बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध संगीतकार-गायकांची जोडी अजय-अतुल यांना अग्निपथमधील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा तसेच सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
‘अग्निपथ’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि प्रियंका चोपड़ा यांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचबरोबर यातील गाणीही तुफान गाजली. त्यातील ‘अभी मुझमें कहीं’ या गाण्याला मिर्ची म्युजिक चा दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच या याच गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून अजय-अतुल यांना पुरस्कार मिळाला.
या पुरस्काराची माहिती त्यांनी स्वत: आपल्या सोशल मिडियावर शेअर केली आणि या पुरस्कार सोहळ्याचे आणि तमाम चाहत्यांचे आभार मानले. तसेच या गाण्याचे गायक सोनू निगम, गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे देखील अभिनंदन केले. हे गाणे आजही अनेकजण गुणगुणताना दिसतात. त्यावरून तब्बल दहा वर्षानंतर हा पुरस्कार मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असेही अजय-अतुल यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालने केली ‘हि’ मोठी चूक ; सोशलवर होतोय ट्रोल
- आम्हाला तुमची सगळी अंडीपिल्ली माहित आहेत, नितेश राणेंचा पुन्हा एकदा सरदेसाईंवर प्रहार
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
- साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक, संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
- …म्हणून उच्चशिक्षित तरुणाने नाकारले भाजपने दिलेले तिकीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
