Share

खळबळ! बीडमध्ये प्रथम लस घेणाऱ्या डॉक्टरला कोरोना

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीड जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे पहिले मानकरी ठरलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे.दोन लस घेतल्यानंतरही एका डॉक्टसह परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. लस घेतल्यावर कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा सर्वांचा समज होता. मात्र, एका डॉक्टरसह परिचारिका व आरोग्य कर्मचारी असे तिघे पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनाही एक लस घेऊनही कोरोना झाला होता.

बीड जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली. यावेळी लसीबाबत विविध चर्चांना उधान आले होते. मात्र, लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सर्वांत आधी पहिली लस आपल्याला द्यावी, अशी विनंती जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली होती. त्यानुसार १६ जानेवारी रोजी पहिली तर १६ फेब्रुवारी रोजी त्यांनी दुसरी लस घेतली. मात्र, रविवारी थंडी- ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. या डॉक्टरसह जिल्हा रूग्णालयातील परिचारिका आणि एक आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लस घेतली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही बाधित आलेल्या डॉक्टरांनी केले आहे. सध्या तालुक्यातील सर्व सरकारी दवाखाने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरु आहे. लसीकरणात पहिल्या काही दिवसांत जिल्ह्याने राज्यात अव्वलस्थान पटकावले होते. मात्र, नंतर भीती व अफवांमुळे लसीकरण मोहिमेत व्यत्यय आला होता. पहिल्या टप्यात आरोग्यकर्मी, दुसऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!