Share

आमची नाही तर महाविकास आघाडीची अडचण वाढणार; ‘त्या’ नोटिशीनंतर नितेश राणेंचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता लूक आऊट नोटीस जारी केली आहे. आर्थिक देवाण-घेवाणी वरून नीलम राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात एका खासगी कंपनीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या कंपनीकडून नितेश राणे आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांनी 40 कोटींचं कर्ज घेतलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे. ३ सप्टेंबर रोजी ही लुक आउट नोटीस पाठवली गेली आहे.

याबाबत आता नितेश राणे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ‘हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे डीएचएफएलचे खाते मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यापुर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्यामुळे अशा नोटिसीचा उपयोग नाही. त्यामुळे याप्रकराणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रांचची अडचण होणार,महाविकास आघाडीची अडचण होणार,’ अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!