🕒 1 min read
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता लूक आऊट नोटीस जारी केली आहे. आर्थिक देवाण-घेवाणी वरून नीलम राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात एका खासगी कंपनीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या कंपनीकडून नितेश राणे आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांनी 40 कोटींचं कर्ज घेतलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे. ३ सप्टेंबर रोजी ही लुक आउट नोटीस पाठवली गेली आहे.
याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत भाष्य करताना धक्कादायक माहिती दिली आहे. ‘राणेंच्या प्रकरणात आर्थिक तक्रार एका संस्थाने केली होती. केंद्र सरकारकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ती तक्रार डीजी ना प्राप्त झाली. त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत लुक आऊट सर्क्युलर काढण्यास सांगितले आहे,’ असं भाष्य गृहमंत्र्यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना रद्द होणार ? बीसीसीआयने साधला खेळाडूंशी संवाद, कारण…
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
