Share

निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का

Published On: 

🕒 1 min read

नाशिक: सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. सर्व पक्षांचा प्रचार आणि प्रसार वेगाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. काही ठिकाणी मनसेचा प्रभाव कमी झाल्याचे देखील बघायला मिळाले. औरंगाबादमध्ये मनसे सोडून शिवसेनेत अनेक पदाधिकऱ्यांनी प्रवेश केला होता. आता नाशिकमध्ये मात्र वेगळी परिस्थिती बघायला मिळत आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सोमवारी नाशिकमध्ये आले होते. यावेळी नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर आणि ग्रामीण भागांतील इतर युवकांनी मनसेत (MNS) प्रवेश केला आहे. यात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास तांबे पाटील व अल्तमश शेख, उपजिल्हाप्रमुख संदीप दळवी, शिवसेना उपविभाग प्रमुख कैलास जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेला (Shivsena) चांगलाच धक्का बसला आहे.

मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून नाशिककरांनी मानसेवर विश्वास दाखवला होता, मात्र ही सत्ता मानसेला कायम ठेवता आली नाही. असं असलं तरी देखील नाशिकमध्ये मनसेचा प्रभाव त्याच सोबत येथील तरुणांचा ओढा हा राज ठाकरे यांच्याकडेच असल्याचे दिसते. मात्र आता आगामी निवडणुकीत काय निकाल येतो ते बघणे महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!