🕒 1 min read
मुंबई : भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून त्यांचे अभिनंदनासह सत्कार केला जात आहे. अनेक नेत्यांनी बावनकुळेंची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही ट्विट करत बावनकुळेंना शुभेच्छा देत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांवर टीका केली आहे.
प्रसाद लाड ट्विट करत म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ६ पैकी ४ उमेदवार विजयी झाले! महाविकास आघाडीतील ३ पक्ष विरुद्ध भाजप लढाई असताना देखील भाजपचा विजय झाला. त्यामुळे निकाल स्पष्ट आहे. आघाडी करून, शिवसेनेने पायावर धोंडा मारून घेतला, काँग्रेस हतबल आहे, राष्ट्रवादी तर गनतीतच नाही!, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला आहे.
विधान परिषद निवडणुकीत @BJP4Maharashtra चे ६ पैकी ४ उमेदवार विजयी झाले!
महाविकास आघाडीतील ३पक्ष विरुद्ध भाजप लढाई असताना देखील भाजपचा विजय झाला
त्यामुळे निकाल स्पष्ट आहे,
आघाडी करून,शिवसेनेने पायावर धोंडा मारून घेतला
काँग्रेस हतबल आहे,
व राष्ट्रवादी तर गनतीतच नाही!#MLCElections— Prasad Lad (@PrasadLadInd) December 14, 2021
नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलावा लागला होता. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून नागपूर विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- …हा काँग्रेससारख्या ‘सेक्युलर’ पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे- संजय राऊत
- ‘अल्पसंख्यांकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण’
- ‘मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या कोणत्याही मराठी सैनिकावर झालेला हल्ला खपवून घेणार नाही’
- ‘बूंद से गईं सो हौद से नही आती’, म्हाडाच्या भरती प्रक्रियेवरून भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
