Share

विजयाचे आनंदाश्रू! बावनकुळेंची फडणवीसांना मिठी, दोघेही गहिवरले

Published On: 

मुंबई : भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांचे गळ्यात हार घालून अभिनंदन केले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी भावनीक होऊन फडणवीसांना मिठी मारली आणि दोघांनाही आनंदाश्रू आनावर होत गहिवरुन आलं. हे बघून कार्यकर्तेही भावूक झाले होते. दोघेही बराच वेळ एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून होते.

चंद्रशेखर बावनकुळे विजयी घोषित होताच त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीस यांनी आपल्या गळ्यातील विजयाचा हार बावनकुळेंच्या गळ्यात घातला.

फडणवीसांनी गळ्यात हार घालताच बावनकुळे यांना गहिवरून आलं. त्यांनी लगेचच फडणवीसांना मिठी मारत आनंदाश्रुंना वाट करुन दिली. हे पाहून फडणवीस यांनाही गहिवरुन आलं. बराच वेळ त्यांनी फडणवीसांना मिठी मारली होती. हे चित्र पाहून भाजपचे कार्यकर्तेही काही काळ स्तब्ध झाले होते. त्यानंतर फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलावा लागला होता. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून नागपूर विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!