मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोरा ( Amrita Arora) यांना कोरोना व्हायरसची (corona virus) लागण झाली आहे. ही माहिती बीएमसीने सोमवारी दिली आहे. यानंतर आता करीना कपूर खानचे अधिकृत वक्तव्य समोर आले आहे. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) (BMC) करिनाचे घर सील केले आहे. बीएमसीकडून सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत करिनाकडून संपूर्ण माहिती मिळालेली नाही, मात्र अभिनेत्री कोणाच्या संपर्कात आली याची बीएमसी चौकशी करत आहे.
#UPDATE | The residence of Kareena Kapoor Khan has been sealed. She has not given proper information yet but our officers are trying to find out that how many people did come in contact with her: BMC (Brihanmumbai Municipal Corporation) pic.twitter.com/2xlgOHz0YT
— ANI (@ANI) December 13, 2021
दरम्यान कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर करीना कपूर खानने इन्स्टा स्टोरी ही शेअर केली आहे. या स्टोरीवर एक नोट शेअर केली असून, ‘मला कोविडचा फटका बसला आहे. मी स्वतःला वेगळे केले आहे आणि सर्व वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, मी त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या चाचण्या करून घ्याव्यात. माझे कुटुंब आणि माझे कर्मचारी दुहेरी लसीकरण झाले आहेत आणि कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मी पण ठीक आहे आणि लवकरच परत येईन.
.jpg)
सूत्रांनी सांगितले की, शनिवारी त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांना कोविडची लागण झाल्याची पुष्टी झाली आणि दोघेही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. या दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात आला असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. सध्या त्या दोघी सध्या होम क्वारंटाईन असून ७ दिवसांनी त्यांची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोघी ज्या मजल्यावर राहतात ते मजले सील करण्यात आले आहे. काही दिवसांपासून करीना आणि अमृताने बऱ्याच पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. त्यांच्या संपर्कात ३० लोक आहे होते. त्यांच्याही करोना चाचणी करण्यात आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
- मी निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘काँग्रेसचा पप्पू आणि शिवसेनेचा पेंग्विन भाजपला थांबवू शकत नाही’
- हा विजय हक्काचा तरीही आमच्यासाठी स्पेशलच-चंद्रकांत पाटील
- …म्हणून आम्ही निवडणूक हारलो; कॉंग्रेसचा अजब दावा
- कर्नाटकात मराठी भाषिक नेत्यावर शाई फेकल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

