Share

कोरोनाच्या संकटानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच बांग्लादेश दौऱ्यासाठी रवाना

Published On: 

नवी दिल्ली: मागील वर्षापासून संपूर्ण जगात असलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रदीर्घ काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. बांग्लादेशसोबत भारताचे दृढ संबंध आहेत. यामुळे या दौऱ्याबाबत आनंदी असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहे.

नेबरहुड फर्स्ट या धोरणातंर्गत भारताने बांग्लादेशला वेळोवेळी मदत केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही भारताने बांग्लादेशला मोठी मदत केली आहे. भारताने बांग्लादेशला कोरोना लसीचे ९० लाख डोस दिले आहेत. ही मदत इतर कोणत्याही देशाला दिलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे.

बांगलादेश दौऱ्याचे असे असणार नियोजन –
ढाकामधील हजरत शाह जलाल इंटरनॅशनलवर नरेंद्र मोदी यांचे विमान सकाळी साडे दहा वाजता लॅन्ड होणार. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना स्वत: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदी ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना १९ बंदुकांची सलामी गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे. पंतप्रधान एअर पोर्टवर परेडचे निरीक्षण करतील. पुढे दोन्ही देशांचे पंतप्रधान एकसोबत सलामी मंचावर जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!