Share

‘लायकीनुसार नुकसानीची किंमत ठरते मग राऊतांची किंमत सव्वा रुपया’; निलेश राणेंची टीका

Published On: 

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी घोटाळ्याबाबत केलेले आरोप मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाही मी पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे, कारण पाटील यांची लायकी सव्वा रुपयाचीच आहे. अशी टीका शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली होती. त्यावर भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणेंनी ट्विट करुन टीका केली आहे. लायकीनुसार नुकसानीची किंमत ठरते, संजय राऊत यांनी स्वत:ची किंमत सव्वा रुपये आहे हे ओळखलं अशी टीका निलेश राणेंनी केलीय.

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1440537158377373697

संजय राऊतांवर आरोप करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते, तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करुन, धापा टाकत ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न तुम्ही केला. हे पाहिल्यावरुन मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटलांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर मी इतक्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो. पाटलांनी जे म्हंटलंय त्या संदर्भात त्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवणार आहे, आणि त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी सव्वा रुपयांची आहे. त्यांची किंमत केवळ सव्वा रुपया आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!