🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील नीट प्रवेशप्रक्रिया रद्द होणार की नाही यासंदर्भात सर्वांच्या मनात शंका असतांनाच परीक्षा रद्द करण्याचा कुठलाही विचार नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी(२० सप्टें.)स्पष्ट केले आहे. तसेच ‘नीट रद्द करण्याचा ज्या राज्यांनी निर्णय घेतला, तो केंद्रात किती टिकेल हे माहीत नाही. शिवाय त्यांनी ही परीक्षा कशाच्या आधारावर केली, याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. मात्र परीक्षा रद्द करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्याकडे कोणतीही मागणी आलेली नाही. आल्यावर त्यावर विचार केला जाईल’ असेही सामंत म्हणाले.
यासंदर्भात अधिक माहिती देत सामंत म्हणाले की,’दक्षिण भारतातील काही राज्यांनी देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ ही प्रवेशपरीक्षा रद्द करत आपल्याच स्तरावर वैद्यकीय प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्रात ही परीक्षा रद्द करण्याचा कोणताही विचार नाही. तसेच त्यासाठीची कोणतीही मागणी आमच्याकडे आली नाही’. तसेच ‘नीट रद्द करण्याचा ज्या राज्यांनी निर्णय घेतला, तो केंद्रात किती टिकेल हे माहीत नाही. शिवाय त्यांनी ही परीक्षा कशाच्या आधारावर केली, याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. मात्र परीक्षा रद्द करण्यासाठी आत्तापर्यंत आमच्याकडे कोणतीही मागणी आलेली नाही. आल्यावर त्यावर विचार केला जाईल’, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत नीट परीक्षेबाबत मत मांडले आहे. ‘यामुळं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तामिळनाडूनमध्ये राज्य सरकारनं नीट बंद करून बारावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, तसा निर्णय महाराष्ट्रात व्हावा यासाठी भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासदंर्भात मागणी केल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …त्या सगळ्या गोष्टींच्या वेदना गीते यांच्या वक्तव्यामधून बाहेर आल्या-प्रवीण दरेकर
- राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
- आरसीबीचा निळ्या जर्सीद्वारे कोवीड योद्ध्यांना सलाम
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांसाठी स्वतंत्र योजना- अजित पवार
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
