Share

‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’

Published On: 

सातारा : देशातील कोरोनाची व्हायरस हळूहळू मंदावत आहे. नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. गेले दोन दिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

परंतु आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असतानाच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘ कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार आहे. कोणी जाणार जरी म्हटलं तरी कोरोना जाणार नाही.’ असे उद्गार उदयनराजे यांनी काढले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सैनिक भरती झालेली नसून शासनाने भरती साठीची मर्यादा वर्षे वाढवून द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं. यावेळी उदयनराजे यांनी अचानक आंदोलनस्थळी भेट देवून मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!