Share

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप 

Published On: 

नांदेड : स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष माधव देवसरकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला जात आहे. त्यांच्या सहकाऱ्यानंचं आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवून विनयभंग केल्याचा आरोप नांदेड येथे पत्रकार परिषदेत केला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावानं कार्य करणारे माधुराव देवसरकर यांनी माझ्यासोबत असलेल्या संघटनात्मक संबंधाचा फायदा घेत माझ्यासोबत असभ्य आणि अश्लील वर्तन केले. तसेच तिचा विनयभंग केला असल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्याच्या पत्नीनं केलाय.

सामाजिक कामाच्या निमित्तानं देवसरकर हे कुटुंबाशी निगडित होते. त्या गोष्टीचा फायदा घेत पदाधिकऱ्यांच्या पत्नीशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, विकृत मानसिकता ठेऊन देवसरकर यांनी या पवित्र संबंधाचा गैरफायदा घेत सहकाऱ्याच्याच पत्नीवर वाईट नजर ठेवली. दरम्यान एका दिवशी रात्री उशिरा त्याच्या पत्नीच्या वैयक्तिक मोबाईलवर आपली फेसबुकची फ्रेंड रिक्वेस्ट का स्वीकारत नाही? असा मेसेज टाकला. तर एका दिवशी कार्यक्रम असल्याच्या बहाण्यानं ते घरी येऊन वाईट नजरेनं माझ्या पत्नीकडं डोळ्यानं इशारा केला आणि लगट करण्याचा प्रयत्न केला, असे आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आले आहेत.

सदर प्रकरणी पोलिसांत तक्रार देऊनही गुन्हा दाखल होत नसल्यानं तक्रारकर्त्यांनी माध्यमांसमोर हे दावे करत दाद मागितली आहे. त्यानंतर तक्रार दिल्याच्या आठ दिवसानंतर नांदेड पोलिसांनी अखेर विविध कलमान्वये संशयित आरोपी  माधव देवसरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सिडको ग्रामीण पोलिसांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधव देवसरकर याच्या विरोधात कलम 509 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे राज्य चर्चेत असताना नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या सवस्थापक अध्यक्षाने वाईट उद्देशाने केलेले गैरवर्तन या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर या महिलेचे सासरे हे आर्मीतील कमांडर होते. त्यांना जिल्ह्यात मोठा मान आहे, समाजातील इतरांवर हा प्रसंग येऊ नये यासाठी आम्ही पुढाकार घेत असल्याचं परिवाराने सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!