🕒 1 min read
मुंबई : अमरावती मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत चक्क शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांची युती झाली आणि हे वृत्त राज्यभरात वाऱ्याच्या वेगाने पसरले. दोन भिन्न विचारांच्या पक्षांनी युती केल्यामुळे अमरावती मनपाच्या या निवडणुकीची चर्चा राज्यभर रंगत आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी शिवसेना आणि एमआयएमच्या या युतीवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपा महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी देखील टीका करत मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेची आठवण करून दिली आहे. ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर ठेवण्यासाठी सत्तेचा विचार करणारी, टिपू सुलतान ची जयंती साजरी करणारी, आणि आता अमरावतीत AIMIM सोबत आघाडी स्थापन करणारी ही शिवसेना नक्कीच हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असूच शकत नाही.’ असं भाष्य पाण्डेय यांनी केलं आहे.
पुढे पाण्डेय म्हणाले, ‘उध्दव जी AIMIM हा तोच पक्ष आहे ज्याच्या एका नेत्याने वक्तव्य केलं होतं की १५ मिनिटांसाठी या देशातील पोलीस बाजूला ठेवा, आम्ही हिंदूंचे काय हाल करू हे पूर्ण देश पाहील. आणि आज आपण त्या AIMIM सोबत सत्ता स्थापनेसाठी त्यांच्या सोबत आघाडी करता आहात. आपण हिंदुत्वाची तर तिलांजली दिलीच आहे. हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांना पण आपण तिलांजली दिली आहे.’ अशी टीका देखील संजय पाण्डेय यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नजीकच्या सहकाऱ्याचं निधन; फोटोसह शेअर केली भावनिक पोस्ट !
- …म्हणून संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी दिला हॉटेल चालकांना अखेरचा इशारा
- ‘…लवकरच शिववडापाव बरोबर शिवशिरखुर्मा ही राज्यातील जनतेला चाखायला मिळेल’
- पूजा चव्हाण प्रकरणी सीबीआय वा SIT ने तपास करावा; चित्रा वाघ यांची उच्च न्यायालयात याचिका
- रश्मी ठाकरेंसह वायकरांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता सोमय्यांना मानहानीची नोटीस


