🕒 1 min read
पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध शिवसेना आमदार संजय राठोड यांच्याशी जोडले गेल्यानंतर या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ या चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. काही फोटो व कथित ऑडिओ रेकॉर्ड्स समोर आले होते. यातील काही किल्प्समध्ये पूजाशी संजय राठोड यांचे संभाषण झाल्याचा आरोप भाजपने केला होता.
दरम्यान, संजय राठोड यांना या आरोपांमुळे वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने पुणे पोलिसांच्या तपासावर देखील संशय निर्माण केला होता. दोन प्रत्यक्षदर्शी तरुणांना पुणे पोलिसांनी सोडल्याने त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची टीका चित्रा वाघ यांनी देखील केली होती.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं आहे. यासोबतच, त्यांनी राज्यातील इतर काही महिलांवरील अत्याचारांच्या घटना समोर आणत राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण च्या प्रकरणातील तपासाबाबत देखील भाष्य केलं आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT किंवा CBI मार्फत करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणात चार दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचं देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, काल त्यांनी समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्याने लातूरमधील तरुणीला अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याच्या बदल्यात शारीरिक सुखाची मागणी केल्याचे धक्कदायक प्रकरण समोर आणत या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी पावले उचलणार असल्याचे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नजीकच्या सहकाऱ्याचं निधन; फोटोसह शेअर केली भावनिक पोस्ट !
- …म्हणून संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी दिला हॉटेल चालकांना अखेरचा इशारा
- ‘…लवकरच शिववडापाव बरोबर शिवशिरखुर्मा ही राज्यातील जनतेला चाखायला मिळेल’
- मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापाला ५ वर्षे सक्तमजुरी
- रश्मी ठाकरेंसह वायकरांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता सोमय्यांना मानहानीची नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
