मुंबई : अभिनेता हृतिक रोशनची आणि पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हे दोघे सतत चर्चेत असतात. नुकतच बिग बॉस १४मधील स्पर्धक अली गोणीचा भाऊ अर्सलनला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. याबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. मात्र अर्सलनच्या पोस्टवर सुझानने कमेंट केल्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा वाढल्या आहे.
काही दिवसांपूर्वी सुझानने तिचा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने अर्सलनने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने सुझानसाठी ‘डार्लिंग’ हा शब्द वापरला होता. ती पोस्ट पाहून सुझानने देखील उत्तर दिले होते. अर्सलनच्या पोस्टवरील सुझानचे उत्तर पाहून त्यांनी प्रेमाची कबूली दिली असल्याचे म्हटले जात आहे. र्सलनने सुझानसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग.. मी प्रार्थना करतो की हे वर्ष तुझ्यासाठी आनंदी असेल. हा आपला सर्वांत चांगला फोटो आहे. खूप प्रेम आणि शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. त्याची ही पोस्ट पाहून सुझानने कमेंट केली आहे. सुझानने ‘धन्यवाद, धन्यवाद, माझे सर्वकाही’ अशी कमेंट केली आहे. त्या सोबतच हार्ट इमोजी देखील वापरले आहे.
https://www.instagram.com/p/CVeulqLIe0F/?utm_medium=copy_link
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हे कायम चर्चेत असतात. जेव्हा त्यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली तेव्हा हृतिकच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. लग्नाच्या १४ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही ते मुलांसाठी नेहमीच एकत्र येताना दिसतात. त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते आहे. मात्र, आता सुझानने तिच्या आयुष्यात मुव्हऑन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुझान आणि अर्सलनने त्याच्या नात्यावर अजून वक्तव्य केलेले नाही. अर्सलन लवकरच ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. यात तो खलनायकाची भूमिका साकारणार असून प्रेक्षकांना त्याचा अभिनय लवकरच पहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- राज्य सरकारची क्रुझवरील पार्टीला परवानगी नव्हती- नवाब मलिक
- नाव फलकावरून खा.भावना गवळींचे नाव वगळल्याने शिवसैनिकांत संताप


