🕒 1 min read
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या(BJP leader Kirit Somaiya) यांनी काल (११ फेबृवारी ) पुणे महापालिकेला भेट दिली. याठिकाणीच काही दिवसांपूर्वी सोमय्या पायरीवर पडले होते. काल याचठिकाणी पुणे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. एकीकडे हे सर्व सुरु असतांना दुसरीकडे जेव्हा सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) ह्या एका घटनेसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या असता सर्व पोलीस किरीट सोमय्या यांच्या बंदोबस्तासाठी गेल्याचे सांगण्यात आले. तद्पश्चात या मुद्द्यावरून चाकणकरांनी संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात फेसबुक पोस्ट करत चाकणकरांनी टीका केली आहे. सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये जन्मदात्या पित्याने स्वतःच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर सर्व पोलीस किरीट सोमय्या यांच्या बंदोबस्तात आहेत , स्टाफ नाही असं उत्तर पोलिसांनी दिले. इतक्या निर्दयी आणि अमानुष घटनेची तक्रार तीन तास घेतली गेली नाही. मी फोन केल्यानंतर ती घेतली गेली,कुणीतरी महापालिकेत येतो आणि त्याच्या बंदोबस्तासाठी संबंध पोलीस स्टेशन दावणीला बांधलं जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तद्पश्चात काल त्याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांचा सत्कार केल्यानंतर पुणे शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जागा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली.
https://www.youtube.com/watch?v=n98kQu4M7SY
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 MEGA AUCTION: जाणून घ्या, पहिल्या दिवशी कोणत्या प्लेयर्सचे ऑक्शन होणार!
- “भाजपमुळे हातात पुस्तकांऐवजी दगड, तोंडात पाढ्यांऐवजी जय श्रीराम बोलून..”, कॉंग्रेसचा गंभीर आरोप
- IND vs WI : वेस्ट इंडिजचा भारताकडून व्हाईट वॉश
- “…हे किरीट सोमय्यांच्या लढ्याचे यश आहे”, अतुल भातखळकरांचा कॉंग्रेसला टोला
- “राष्ट्रवादी राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देणार का?”, भातखळकरांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
