Share

“…तर प्रशासनाचीही दुरवस्था लक्षात येते”, ‘त्या’ घटनेवरून राऊतांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नुकतीच मध्य प्रदेशमध्ये आरोग्य विभागाची परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवणारी एक घटना घडली. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘मध्य प्रदेशातील रिवा येथे आजारी महिलेला १० किलोमीटर अंतरावरील आरोग्य केंद्रात उपचारासाठी न्यायचे होते. परंतु त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. शेवटी या महिलेच्या मुलींनी आजारी आईला खाटेवर झोपवून १० किलोमीटर पायपीट करीत आरोग्य केंद्रात आणले. मात्र तोपर्यंत आजारी महिलेचा मृत्यू झाला होता. पुन्हा या महिलेच्या मुलींची फरफट येथेच थांबली नाही. मृतदेह परत गावाकडे नेण्यासाठीही त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आईचा मृतदेहही त्यांना खाटेवर टाकूनच पायी परत नेण्याची वेळ आली. त्यावरून मध्य प्रदेशमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच नव्हे, तर प्रशासनाचीही काय दुरवस्था आहे हे लक्षात येते.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मध्य प्रदेशसारखे ‘बिमारू’ राज्य भाजपच्या राजवटीत ‘विकासाच्या वाटेवर’ आणण्यात आले, असा प्रचार नेहमीच केला जातो. मात्र रिवासारख्या घटना या प्रचारातील हवा काढून घेतात. ग्रामीण-आदिवासी जनतेच्या नशिबी आजही किती भयंकर यातना लिहून ठेवल्या आहेत, या दाहक वास्तवाची जाणीव करून देणारीच ही घटना आहे. अर्थात ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा असंख्य घटना घडल्या आहेत.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!