Share

IPL 2022: रवी बिश्नोईच्या सुपर थ्रोवर ऋतुराज रन आऊट ; अवघ्या १ धावांवर माघारी परतला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलचा ७ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात चेन्नईची पहिली विकेट ही दुर्दैवाने एक रन आऊटच्या स्वरूपात पडली. ऋतुराज गायकवाड सलग दुसऱ्या सामन्यात दोन अंकी धावा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे.

झाले असे की, सामन्यात लखनऊसाठी (LSG) पर्दापण करणाऱ्या तिसर्‍या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टायने फुल लेन्थ बॉल टाकला, ज्यावर ऋतुराजचा (Ruturaj gaikwad) फ्लिक शॉट चुकला, ज्यामुळे चेंडू त्याच्या पॅडवर आदळला, सुपर जायंट्सचे खेळाडू LBW अपीलसाठी गेले पण अंपायरने ते नाकारले. मात्र ऋतुराजला एक धाव हवी होती परंतु रॉबिन उथप्पाने ती नाकारली, ज्यामुळे चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गायकवाडला पुन्हा क्रीजवर परतावे लागले परंतु रवी बिश्नोईच्या (ravi bishnoi) रॉकेट थ्रोने तो परत येण्यापूर्वीच स्टंप उडवले.

https://twitter.com/AmanPreet0207/status/1509535102950281217?s=20&t=EZtzYHosTH2alN9pZs-YZw

रवी बिश्नोईंच्या सुपर थ्रोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर ऋतुराज पुन्हा कोणतीही मोठी कामगिरी न करता माघारी परतल्याने चेन्नईचे चाहते थोडे निराश झालेले दिसत आहेत. त्याने ४ चेंडूत केवळ एक धाव केली होती तर मागच्या सामन्यात तो ४ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला होता.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!