🕒 1 min read
मुंबई: चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू शिवम दुबे याने आयपीएलच्या ७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात CSK चे फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये दिसले. सामन्यापूर्वी लखनऊचा कर्णधार केएल राहुलने चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेला चेन्नई सुपर किंग्ज (csk) पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याच्या मूडमध्ये दिसत होता. सलामीवीर म्हणून रॉबिन उथप्पाने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून हे संकेत दिले. त्याला पाहून शिवम दुबेनेही (shivam dube) डावाच्या सुरुवातीलाच स्फोटक फलंदाजी केली. चेन्नईने डावात २१० धावा केल्या. सीएसकेच्या या खेळीचे आकर्षण केंद्रस्थानी राहिलेला डावखुरा फलंदाज शिवम दुबेने ४९ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
गेल्या सामन्यातील फ्लॉपनंतर शिवम दुबेकडून अशा प्रकारची फलंदाजी अपेक्षित नव्हती. याआधी त्याच्यावर बरीच टीकाही होत होती. मात्र या सामन्यात शिवमने ३० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४९ धावा केल्या. त्याची फलंदाजी बघून अनेकांना युवराज सिंगची आठवण झाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : थाला..थाला..थाला! महेंद्रसिंह धोनीचा मुंबईत मोठा पराक्रम; नक्की वाचा!
- IPL 2022 : उथप्पाची सुरुवात अन् थालाचं फिनिशिंग…भारीच! चेन्नईचा नवख्या लखनऊसमोर २१० धावांचा डोंगर
- IPL 2022 : ९ चेंडूत ३८ धावा..! मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर घोंगावलं उथप्पाचं वादळ!
- IPL 2022: रवी बिश्नोईच्या सुपर थ्रोवर ऋतुराज रन आऊट ; अवघ्या १ धावांवर माघारी परतला
- IPL 2022 : देखो वो आ गया..! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मिळाली आनंदाची बातमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
