Share

IPL 2022 : उथप्पाची सुरुवात अन् थालाचं फिनिशिंग…भारीच! चेन्नईचा नवख्या लखनऊसमोर २१० धावांचा डोंगर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलचा ७ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांचा हा निर्णय उलटा फिरलेला दिसतोय. कारण CSKच्या फलंदाजांनी या सामन्यात धुव्वादार फलंदाजी करत २१० धावा फलकावर लावल्या आहेत.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या नवीन सलामी जोडीसह उतरला.मात्र सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) अवघी १ धाव काढून दुर्दैवाने धावबाद झाला. पण त्यानंतर रॉबिन उथप्पा (५०) आणि मोईन अली (३५) यांनी लखनऊच्या गोलंदाजांची दमछाक उडवून दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ३० चेंडूत ५६ धावांची भागीदारी झाली.

रॉबिन आणि मोईन बाद झाल्यानंतरही सीएसकेचा धमाका थांबला नाही. कारण शिवम दुबे (४९) आणि अंबाती रायडू (२७) यांनी मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. शेवटी रवींद्र जडेजा (१७) आणि चेन्नईचा ‘थाला’ महेंद्रसिंग धोनी यांनीही स्फोटक फलंदाजी केली. धोनीने येताच चेंडू बाऊंड्री बाहेर पोहचवला. या उत्कृष्ट फलंदाजीमुळे सीएसकेची धावसंख्या ७ गडी गमावून २१० धावांवर पोहोचली आहे. लखनऊ आता या धावांचे डोंगर पार करत पहिला विजय नोंदवण्यासाठी उतरेल.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!