Share

‘कृषी कायद्यांबाबत चर्चा करायला सरकार घाबरतंय’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेल्या वर्षी नवे 3 कृषी कायदे पास करण्यात आले. देशभरातून त्याचा जोरदार विरोध झाला. काँग्रेसनेही त्याचा कडाडून विरोध केला होता. कृषी कायद्यांवर चर्चा न करता लागू केल्याचा आरोप काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. आणि काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.

कृषी कायदे (Farm Act) लागू करताना आणि आता कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकावरही केंद्र सरकार (Centel Government) ने चर्चा केली नाही, चर्चा न करताच कृषी कायदे मागे घेतले. चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार घाबरत आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. विना चर्चा कृषी कायदे मागे घेतल्यावरून राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सरकार चर्चेला घाबरत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीचे नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आज अधिकृतरित्या कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत.

कृषी कायदे मागे घेताना चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. मात्र केंद्र सरकारने घाबरून चर्चा न करताच कृषी कायदे मागे घेतल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!