🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash desai) स्थानिक काँग्रेस पक्षाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच निधी वाटपामध्ये अन्याय करीत असल्याची तक्रार शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb thorat) यांच्याकडे केली आहे. राज्यात जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही शिवसेना काँग्रेस मध्ये शहरात मेळ नाही. हे वारंवार सिद्ध झाले आहे. आता पुन्हा एकदा शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी थेट पालकमंत्र्यांविरोधातच पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केल्याने त्यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
राज्यात शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे सरकार आहे. तिन्ही पक्ष मिळून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. परंतु जिल्ह्यात पालकमंत्री सुभाष देसाई हे जिल्हा नियोजन मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या निधी वाटपात शिवसेनेलाच जास्त महत्त्व देत आहेत. त्यांच्या लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रस्तावांना जास्त निधी देत आहेत. काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देत नाही. तसेच विकास कामांसाठी निधीही देत नाही. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.
पालकमंत्री निधी देत नसल्याने विकास निवडणुकीत मानतेसमोर आहेत. त्यामुळे आगामी कसे जायचे, असा प्रश्न स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोर उपस्थित केला. या प्रकरणी वरिष्ठांच्या कानावर ह प्रश्न टाकावा, अशी मागणीही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बाळासाहेब थोरात हे नुकतेच शहरात आले होते. त्याप्रसंगी सुभेदारी विश्रामगृह येथे कार्यकर्त्यानी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पालकमंत्री काँग्रेस पक्षाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देवोलिना भट्टाचार्जीवर भडकला सलमान खान, म्हणाला….
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- अश्विनने मोडला हरभजनचा मोठा विक्रम; ट्विट करत केले अभिनंदन
- कानपूर कसोटीत अश्विनचा बोलबाला; टॉम लाथम बाद होताच रचला इतिहास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
