मुंबई : बिग बॉस १५ मध्ये जरी सुरुवातीपासून लोकांना घरातील सदस्यांची वेगवेगळी रूपे पाहायला मिळाली, आता या आठवड्यात प्रेक्षकांना घराघरात खूप नाट्य पाहायला मिळाले, जिथे देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena bhattacharjee) , रश्मी, राखी आणि रितेश या व्हीआयपी स्पर्धकांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळाली, तर दुसरीकडे देवोलीना आणि शमिता शेट्टीचे (Shamita shetty)वैर घराघरात पाहायला मिळाले. मात्र शमिताला सुनावणं देवोलीनालाच महागात पडलं. देवोलीनाच्या वागण्यावर सलमान खान चांगलाच संतापला होता.
शमिता शेट्टीला टार्गेट करणाऱ्या देवोलीनाची सलमान खानने (Salman khan) सुनावले आहे. देवोलीनाने शिमितावर केलेल्या एका कमेंटमुळे सलमान खान तिच्यावर संतापला. एका टास्कमध्ये देवोलीनाने शमिताला किडा म्हंटलं. न आवडणाऱ्या स्पर्धकासाठी या टास्कमध्ये स्लोगन तयार करायचं होतं. ज्यात देवोलीना शमितासाठी एक स्लोगन तयार केलं. ज्यात ती म्हणाली, “शमिता हैं ऊपर से हीरा, पर अंदर से हैं कीड़ा”. देवोलीनाची ही कमेंट ऐकून शमिताला धक्काच बसला.
शमितानेही देवोलीनाला सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘खुद को समझ मत तू सबसे टॉप, देवोलीना तू है सबसे फ्लॉप’ हे ऐकल्यावर भडकलेल्या देवोलीनाने शमितावर निशाणा साधला. तिने शमिताला नको ते सुनावण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी सलमान खानने दवोलीनाला थांबवत तिला चांगलंच सुनावलं होतं. तसेच शमितावर टीका करून तू प्रकाशझोतात येण्याता प्रयत्न करत आहे.” असं म्हणत सलमानने देवोलीनाची कानउघडनी केली.
बिग बॉस १५ मधील काही फोटो.
महत्वाच्या बातम्या
- …ते सर्व पुरावे आम्ही कोर्टासमोर ठेऊ- नवाब मलिक
- ‘आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवाई प्रवाशांची अद्ययावत माहिती मिळाल्यास संसर्गाला रोखणे होईल सोपे’
- हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठक
- ‘भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे…’, फरार मेहुल चोक्सीने व्यक्त केली भीती
- जिल्ह्यातील ‘या’ गावांनी केला 100 टक्के लसीकरणाचा आकडा पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

