Share

महापौर किशोरी पेडणेकरांनी मध्यरात्री अचानक मुंबई विमानतळाला भेट देत केली पाहणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी(२८नोव्हें.)परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत पहाणी केली.

यावेळी बोलत असतांना त्या म्हणाल्या की,’गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आपण त्यावर मात केली. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, सध्या तरी राज्यात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु मागचा अनुभव पाहाता आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवे नियम जारी केले आहेत. परदेशातून आलेला एकही प्रवाशी मुंबई विमानतळावरून आरटीपीसीआर झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही. त्यासाठी ५० तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. सोबतच ज्या देशात ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक आहे, अशा देशातून भारतामध्ये परतणाऱ्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन केले जाणार आहे.’ तसेच मुंबईकरांनो घाबरू नका, फक्त काळजी घ्या असेही पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, नव्या विषाणुने पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देखील नवे नियम जारी करण्यात आले आहे. नव्या नियमानुसार जर कोणी विनामास्क आढळले तर त्याच्याकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. तसेच एखादा ग्राहक विनामास्क खरेदी करताना दिसल्यास संबंधित दुकानदाराकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!