🕒 1 min read
अफगाणिस्तान : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून सतत निर्दयतेचे आणि क्रूरतेचे नाव-नवीन उदाहरण बघायला मिळत आहेत. तालिबानने बंडखोरांना माफी दिल्याची घोषणा घेल्यानंतर देखील त्यांनी आपली क्रूरता दाखवणे थांबविले नाही. फक्त एव्हढेच नाही तर त्यांनी लहान मुलांनाही सोडले नाही. नुकतीच अफगाणिस्तानच्या तखार प्रांतात, तालिबानने एका मुलाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पंजशीर माध्यमाच्या वृत्तानुसार तालिबानला संशय होता की मुलाचे वडील तालिबानच्या विरोधात लढणाऱ्या पंजशीर खोऱ्यामधील सैन्यासोबत मिळालेले होते. यामुळे त्याला ठार मारण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानचा ताबा मिळविल्यानंतर तालिबानने आश्वासन दिले होते की ते कोणावरही सूड उगवणार नाहीत. परंतु त्यानंतर पंजशीरमध्ये नागरिकांना ठार केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
दरम्यान, माध्यमांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की,’मुलाचे वडील पंजशीर खोऱ्यातील विरोधा दलाचा भाग असल्याचा संशय आल्यानंतर ताखार प्रांतात तालिबान्यानी एका मुलाची हत्या केली. तालिबान्यांनविरोधात आवाज उठवणाऱ्या अफगाणांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचे यातून समोर आले आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपी करण्यासाठी अजितदादांच्याअध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन
- बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकीसह अतिवृष्टीग्रस्त भागात राणाजगजितसिंह यांचा पायी दौरा
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- ‘कॉंग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही’
- दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले होते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
