नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत.
प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले. देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल केला.
दिल्लीमध्ये झालेल्या घटनेचा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रातील मोदी सरकावर टीकेची झोड उठवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला होता.
शेतकऱ्यांना पाठिंबा देणे आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणे ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची नौटंकी असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले होते . तसेच हा कायदा मुळात काँग्रेसचाचं आहे. एका बाजूला केंद्राने तुमचाच कायदा आणला आहे. तुमचीच भूमिका केंद्र राबवत आहे. मग तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची बी टीम नाही का? असा प्रश्न विचारत आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युतर दिले आहे. शरद पवार देशाचे कृषिमंत्री असताना त्यांनी कृषी मालाचे हमी भाव दुप्पट केले. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या माध्यमातून कृषी माल खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ केली, व त्यामुळे भारताचा शेतकरी हा खऱ्या अर्थाने सुखी व सधन झाला.पवार साहेबांच्या कृषी धोरणांना साथ देत देशातील शेतकऱ्यांनी कृषी मालाचे विक्रमी उत्पादन केले आणि पहिल्यांदा भारत देश हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भर झाला असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे .
पवार यांच्या कृषी धोरणांची नोंद संयुक्त राष्ट्राच्या फुड अंड अग्रिकल्चर ऑर्गानिझेशन यांनी सुद्धा घेतली. पवार यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत अनेक पुरस्कारही भारत सरकारला मिळाले याचा विसर प्रकाश आंबेडकर यांना पडला असावा. २०१९ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची बी टीम म्हणून कोण काम करत होतं हे सबंध राज्याच्या जनतेला माहित आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे असे महेश तपासे मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- जनतेशी मनमोकळा संवाद साधताना धनंजय मुंडे झाले भावूक
- आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी : दिल्ली पोलीस
- ‘विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’
- आघाडी सरकारचा आडमुठेपणा; शेतकऱ्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारली
- ‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

