बीड :– संत भगवान बाबा यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या व संत वामन भाऊंचा पदस्पर्श लागलेल्या खोकरमोहा या गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
खोकरमोहा गावातील स्व. गोपीनाथ मुंडे ग्राम सचिवालयाच्या इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर आमदार बाळासाहेब आजबे यासह पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री मुंडे यांनी कोरोना मुळे आठ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर जनतेशी मनमोकळा संवाद साधत असून त्यामुळे भावूक झाल्याची भावना व्यक्त केली.एखाद्याला भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत, कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी साथ दिली, आशीर्वाद दिला. मी शब्दात आभार मानू शकत नाही. असे यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा करणार; राज्यमंत्री बनसोडे यांचा निर्धार
- आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी : दिल्ली पोलीस
- ‘विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’
- आघाडी सरकारचा आडमुठेपणा; शेतकऱ्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारली
- ‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

