Share

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी : दिल्ली पोलीस

Published On: 

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले.देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल झाला.

कालच्या हिंसाचाराच्या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.

जगभरातून या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. या कालच्या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर ,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन , परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून ,शांतता राखावी असं आवाहन दिल्लीचे पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी केल आहे.

टॅक्टर रॅली संदर्भात शेतकरी संघटना आणि पोलीस यांच्यात झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्याचा मार्ग आणि वेळ निश्चित करण्यात आली होती , मात्र अटींच पालन न करता शेतकऱ्यांनी हिंसाचाराचामार्ग स्वीकारला असल्याचंही,पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!