Share

बीडमध्ये शिवसंग्रामला धक्का, शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

Published On: 

बीड : शहरातील बलभीम नगर, पेठ बीड भागातील शिवसंग्रामचे विनोद हातागळे आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला. पेठ बीड भागातील या प्रवेशाने शिवसंग्रामला धक्का बसला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या युवकांची संख्या वाढु लागली आहे.

आगामी नगर पालिका निवडणूकीत आपल्याच विचारांची सत्ता असेल, कोणाच्या दबावाला, अमिषाला बळी पडू नका, ये तो झाकी हैं, नगर पालिका बाकी हैं, जनतेचे आशिर्वाद आपल्या सोबत आहेत. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही असे प्रतिपादन आ.क्षीरसागर यांनी यावेळी केले.

यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनिल धांडे, आसाराम गायकवाड, अशोक वाघमारे, भाऊसाहेब डावकर, झुंजार धांडे, अशोक रोमण, इरफान बागवान, जयमल्हार बागल, जावेदभाई कुरेशी, पंकज बाहेगव्हाणकर इत्यादी उपस्थित होते.

संदिप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणे संवाद साधला. आपण शांत आहोत पण येणाऱ्या काळात ही शांतता काय असते दाखवून देऊ. जेष्ठांचे आशिर्वाद, जनतेची साथ आपल्या सोबत आहे. भविष्यात आपल्या विचारांची नगर पालिका निवडणूकीत सत्ता असेल असा विश्वास व्यक्त करत कोणाला घाबरू नका, जोमाने कामाला लागा. या भागाचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!