Share

५६ आमदारांच्या पक्षाला ‘सिरियसली’ घेण्याची गरज नाही; निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं

Published On: 

नवी दिल्ली : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आलाय. इतकंच नाही तर राणेंचा मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देखील देण्यात आला. मराठा समाजातील चेहरा, तसेच येत्या स्थानिक निवडणूका बघता राणेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

शिवसेना आणि राणे घराण्याचे गेल्या काही वर्षांमधील असलेलं वैर हे उभ्या महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलं आहे. शिवसेनेपासूनच सुरुवात झालेल्या नारायण राणे यांची नंतरच्या काळात शिवसेनेशीच कटुता झाली. आता त्यांनी शिवसेनेनंतर काँग्रेस मग स्वतःचा पक्ष आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास कायमच चर्चेत राहिला आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या शपथविधीनंतर नारायण राणे यांचे सुपुत्र व भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला. ५६ आमदारांच्या पक्षाला ‘सिरियसली’ घेण्याची गरज नाही, त्यांची मजल किती ? असं म्हणत त्यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. यासोबतच, नारायण राणे हे कायमच आपलं काम जबाबदारीने करत असतात. आता देखील त्यांना देशसेवेची ही संधी मिळाली असून ते भाजपला नंबर १ क्रमांकाचा पक्ष ठेवण्यासाठी काम करत राहतील असं निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!