🕒 1 min read
मुंबई : आलिया भट्ट स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाची क्रेझ केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही पाहायला भेटत आहे. लोकांना ‘गंगूबाई’ची कथा आणि आलिया भट्टची प्रतिभा खूप आवडली आहे. अशीच क्रेझ पाकिस्तानी कपल अभिनेता मुनीब बट आणि अभिनेत्री आयमान खानमध्ये पाहिली. पाकिस्तानी अभिनेता मुनीब बट्टने आपल्या पत्नीला चित्रपट दाखवण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केले होते. तो म्हणतो, “संपूर्ण थिएटर बुक झाले आहे, आयमान चित्रपट चांगला आहे.”
आयमान ही आलिया भट्टची इतकी मोठी चाहती आहे की, त्यामुळे तिच्या नवऱ्याने तीला हे सुंदर सरप्राईज दिले आहे. अमल मुनीब यांना एक सुंदर मुलगी देखील आहे. त्यांना हा चित्रपट आवडला आणि सर्व स्मायली आनंदी रिव्ह्यू देऊन थिएटरमधून बाहेर पडले.
‘गंगुबाई काठियावाडी’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले गंगूबाई काठियावाडी हा १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा आलिया भट्टचा ५ वा चित्रपट ठरला आहे, ज्याने १०२.६० कोटींचा गल्ला जमवला. अजूनही हा चित्रपट रसिकांची पहिली पसंती असून त्याला उदंड प्रेम मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
