Share

…त्या सगळ्या गोष्टींच्या वेदना गीते यांच्या वक्तव्यामधून बाहेर आल्या-प्रवीण दरेकर

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या वक्तव्यासंदर्भात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. यावेळी दरेकर म्हणाले की,’महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने शिवसेनेला दाबून किंबहूना दबाव टाकून, पक्षाचा विस्तार करतय आणि शिवसेनेला नुकसान पोहचतय. या सगळ्या गोष्टींची घुसमट, त्या वेदना, संवेदना, भावना अनंत गीते यांच्या वक्तव्यामधून आज आल्यात, असे माझे म्हणणे आहे. तसेच अनंत गीतेंची भूमिका बरोबर आहे, की संजय राऊत यांची हे शिवसेनेने स्पष्ट करावे’ असेही ते म्हणाले.

पुढे बोलत असतांना दरेकर म्हणाले की,’जी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर अनैसर्गिक युती झाली, ती एक तडजोड होती. हा गीते यांनी अत्यंत स्पष्टपणे केलेला उल्लेख खरा आहे. त्यामुळे, आज शिवसैनिकांचे तालुकास्तरावर जे खच्चीकरण होतंय, शिवसेनेचे आमदार ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत, त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी देण्याबाबात जो दुजाभाव आहे. जिल्हा समिती, राज्य समितींच्या नेमणुका असो, ज्या पद्धतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात आहेत. या सगळ्यांचा परीपाक म्हणून, अनंत गीते यांचं हे विधान समोर आलेलं आहे. की, शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत.’

दरम्यान, ‘माझी माध्यमांद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुखांना विचारणा आहे की, अनंत गीते यांचे विधान संजय राऊत यांनी खोडलेले आहे की ते महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत. या संदर्भात शिवसेनेने अनंत गीते यांची भूमिका बरोबर आहे की संजय राऊत यांची अधिकृत पक्षाची भूमिका आहे? हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. नेमकी पक्षाची काय भूमिका या संभ्रमावस्थेत शिवसैनिक दिसत आहेत. तसेच, अनंत गीते यांनी पाठीत खंजीर खूपसण्यासंदर्भात देखील वक्तव्य केलेलं आहे. त्या संदर्भात देखील संपूर्ण महाराष्ट्राला हा विषय माहिती आहे. कुणी कोणाच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार बनवलं आहे हे सर्वांना माहिती आहे’ असेही दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!