Share

‘सुप्रिया ताई, सोमय्यांचे लक्ष सध्या बेनामी संपत्तीवर; वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल’

Published On: 

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र कालपासून पाहत आहे. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यासाठी कोल्हापूरला जात असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या कराडमधून परतले आणि कोल्हापुरात होणारा संभाव्य संघर्ष तात्पुरता टळला असल्याचे पहायला मिळाले.

राष्ट्रवादी पक्षाने त्यांना कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा दिलेला इशारा आणि स्वागताला भाजपने केलेली तयारी यामुळे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची चिन्हे होती. दरम्यान या सर्व प्रकरणावर काल औरंगाबाद येथे बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले होते. केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. तसेच किरीट सोमय्या हे सीबीआयचे प्रमुख आहेत का, की ईडीचे डायरेक्टर आहेत का? असा टोला सुळे यांनी यावेळी बोलताना लगावला होता.

दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या याच वक्तव्याचा समाचार आता भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी घेतला आहे. ‘ताई किरीट सोमय्या कोण आहेत हे अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, हसन मुश्रीफ यांना विचारा, उगाच त्यांना डिवचू नका, त्यांचे लक्ष सध्या बेनामी संपत्तीवर आहे, उगाच वांग्याच्या शेतीकडे वळाले तर तुमचे अवघड होईल.’ असा खोचक टोला प्रदीप गावडे यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!