🕒 1 min read
मुंबई : गेल्या वर्षीपासून कोरोना रोगाने जगभरात थैमान घातले आहे. या रोगावर ठोस उपचार नसल्याने सुरुवातीला सर्व देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली होती. भारतात देखील मार्च महिन्यापासून कोरोना रोगाने थैमान घातल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे विविध क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांना मोठा फटका बसला असून लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे.
या टाळेबंदीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून आता पुन्हा एका देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दरम्यान, रोजगार गमावल्याने अनेकांच्या उदर्निवाहाचा प्रश्न देशात गंभीर झाल्याने काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. गरिबीची समस्या देशात वेगाने पसरत असून Pew Research Center च्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे देशात गरिबांची संख्या ६ कोटींवरून थेट १३ कोटी चाळीस लाख लाख इतकी झाली आहे.
मोदी जी ने कर दिखाया…… अच्छे दिन@narendramodi@RahulGandhi@priyankagandhi https://t.co/AHeq6gxlKF
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 21, 2021
म्हणजेच गेल्या ३६५ दिवसांत गरिबीची संख्या दुप्पटीहून अधिक झाली आहे. यामुळे ४५ वर्षांनी भारताचा सामूहिक गरिबीच्या श्रेणीमध्ये समावेश झाला आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मोदीजींनी करून दाखवलं…अच्छे दिन’ असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’: ममता बॅनर्जी
- कोरोनाच्या लढ्यात भाजपकडून राजकारणाला महत्त्व-प्रकाश आंबेडकर
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- कडक लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी नसेल पण…; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
