परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भाव तसेच रुग्णालयामध्ये रुग्णांना कमी पडणारे ऑक्सिजन या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात ऑक्सीजनची कमतरता भासू नये म्हणून, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतलेल्या पुढाकारातून परभणीमध्ये परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ऑक्सीजन प्लांट लवकरच स्थलांतरीत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, आपत्कालीन स्थितीत औषधोपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना सुरळीतपणे ऑक्सीजन पुरवठा व्हावा, यासाठी या दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाने रुग्णांना आता नक्कीच फायदा होणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित आहे. सध्याच्या स्थितीत रुग्णांलयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या दृष्टीकोनातून विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी परळी वैजनाथ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ऑक्सीजन प्लांट परभणीमध्ये स्थलांतरीत करण्याबाबत उच्चपातळीपर्यंत प्रयत्न केले. त्याचा परिणाम हा प्लांट तेथून परभणीत हलवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
दरम्यान १० ते 12 दिवसात तो प्लांट परभणीमध्ये स्थलांतरीत होणार आहे. असे संकेत देखील मिळाले आहेत. या प्लांटचे वैशिष्ट्य हवेतून ऑक्सीजन निर्मिती करण्याचे आहे. या व्दारे ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्यामुळे हा प्लांट आपत्कालीन स्थितीतील रुग्णांच्या दृष्टीने जीवन संजीवनी देणारा ठरणारा आहे. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत असलेल्या ऑक्सिजन प्लांट हा लिक्विड ऑक्सीजन बनवत आहे. मात्र, नवीन प्लांटव्दारे हवेतून ऑक्सीजन निर्मिती करता येणार आहे. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या इमारतीत खुप प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर बनवण्यात येणार आहे.
- अनिल परब सेवाभावी मंत्री; सेवा आणि मेवा कुठे जातो याची चौकशी व्हावी ! – राणे
- पालघर प्रकरणातील साधूंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही – कदम
- मुख्यमंत्री फार सौम्य आहेत, त्यांनी कठोर पावलं उचलली पाहिजे – संजय राऊत
- मला हाफकिनचे सामर्थ्य माहित आहे; जितेंद्र आव्हाडांनी मानले पंतप्रधानांचे आभार !
- ‘कालपर्यंत मुली उचलून आणण्याची भाषा वापरणारे आज साधूंसाठी आंदोलन करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

