🕒 1 min read
मुंबई: सध्या गाजत असलेले अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक सापडली बरोबर महिनाभरापूर्वी २५ फेब्रुवारीला हि घटना घडली आणि सिनेमा देखील लाजवेल अशा घडामोडी या प्रकरणात दररोज घडत आहेत. यामध्ये जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील याच घटनानांनी गाजले आणि सामन्यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिले. यावरून दररोज माध्यमांमधून आपल्यावर बातम्यांचा भडीमार सुरू आहे.
मात्र अद्याप देखील नवनवीन प्रकरण पुढे येत असून केवळ गुंतागुंत वाढत आहे. यावरून आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरामधून या सर्व आरोपांचा सामना करायला सुरुवातीला कुणीच पुढे आले नाही! सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची योजना नाही हे पुन्हा दिसले. असे सांगण्यात आले आहे. तसेच ‘अधिकाऱ्यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरले !’ असे यावेळी म्हटले आहे.
बुरा न मानो..
होली है……… pic.twitter.com/4pqmYKGJoC— Sanjay Raut (@rautsanjay61) March 28, 2021
दरम्यान, दिल्लीत राहून सातत्याने पत्रकारपरिषदांच्या माध्यमातून भाजपचा हल्ला परतवून लावणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे वेळोवेळी सरकारला सल्ला देत महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता पुन्हा राऊतांनी . ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’, असा मजकूर असलेले एक नवे ट्विट केले आहे. त्यामुळे वास्तवाकडे दुर्लक्ष करु नका, अशा आशयचा राऊतांचा हा संदेश नेमका कोणासाठी आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी ‘बुरा न मानो.. होली है………’ अशी कॅप्शनही लिहली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशा आरोपांमुळे सरकारे पडू लागली तर केंद्रातल्या मोदी सरकारला सगळय़ात आधी जावे लागेल’
- आज भारत-इंग्लंड दरम्यान निर्णायक वनडे सामना
- सचिन पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूलाही कोरोनाची लागण
- BCCIचा मोठा निर्णय : ‘तो’ वादग्रस्त नियम बीसीसीआयने हटवला
- ‘कोरोना झाला तर जगाला सांगायची काय गरज’ या क्रिकेटपटूचा सचिनला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
