🕒 1 min read
Sanjay Raut । मुंबई : शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेनेत गळतीच सत्र सुरूच आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला. शिवसेनेत आता १५ आमदार उरले आहेत. असं असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मात्र बंडखोरांवर सडकून टीका करत आहेत. राऊत हे टीकेची एकही संधी सोडत नाहीत.
संजय राऊत हे दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी लोकसभेतील आमच्या खासदारांची संख्या ही तुम्हाला लवकरच दिसून येईल, आमची संख्या जशीच्या तशी राहील एवढा विश्वास मी तुम्हाला देतो, असं वक्तव्य देखील त्यांनी केलय. तर पुढे शिंदे गटातील आमदार उदय सामंत हे नशीब 115 खासदार बोलले नाहीत, 15 असतील किंवा 115 असतील, पण शिवसेनेच्या खासदारांचा आकडा हा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत कायम राहील हेच मी सांगू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, याआधी राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील निशाणा साधलाय. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. तर दुसरीकडे कॉलराचं थैमान सुरु आहे. पावसामुळे राज्यभरात 100 लोकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल आम्हाला खूप सल्ला द्यायचे. आता त्यांची गरज आहे. आता त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire : “मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अनेक आमदार ‘मातोश्री’वर डोकं टेकवतील”; चंद्रकांत खैरेंचा दावा
- Prakash Ambedkar : “हे श्रीमंतांचे सरकार, त्यामुळे पेट्रोलच्या दरात…”, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- Maharashtra Cabinet Decision | नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान ; शिंदे सरकारचा निर्णय
- Navneet Rana : “मागच्या सरकारला जमल नाही ते…”, शिंदे सरकारच्या मोठ्या घोषणेनंतर नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- kangana Ranaut | पहा कंगना रानौतचा ‘इंदिरा गांधी’ लुक; ‘इमर्जन्सी’ चा टीजर रिलीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
